Maval Corona Update : मावळ तालुक्यात आज 164 जणांना डिस्चार्ज; कोरोनाचे 87 नवीन रुग्ण

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (शुक्रवारी, दि. 25) कोरोनाचे 87 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यातील कोरोनाबधितांची एकूण संख्या 4 हजार 295 झाली आहे. तर दिवसभरात 164 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

तळेगाव (पुरुष, 37 वर्ष), माळवाडी (पुरुष, 69 वर्ष), शेवती (महिला, 69 वर्ष) येथील तीन रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 53 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 34 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. तळेगाव शहरात 19, लोणावळा शहरात 31 आणि वडगाव शहरात 3 रुग्ण आढळले आहेत.

एकूण 4 हजार 295 रुग्णांमध्ये सध्या 774 रुग्ण सक्रीय आहेत. तर 3 हजार 382 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 139 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 1 हजार 305, लोणावळा नगरपरिषद 938 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 261 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 1 हजार 791 रुग्ण आढळून आले आहेत.

ग्रामीण भागात आढळलेले रुग्ण

शुक्रवारी मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये कामशेत 5, कुसगाव बु. 3, सोमाटणे 3, वारू 3, चांदखेड 2, कान्हे 2, नवलाख उंब्रे 2, दारुंब्रे 2, तर परंदवडी, वराळे, उर्से, इंदोरी, कुसगाव प मा, साळूम्बरे, आढले खु, शिवणे, वाकसाई, येळसे, गोडुंब्रे, शेवती येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

मावळातील 54 गावांमध्ये 15 पेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहेत. तर 7 गावांमध्ये 15 पेक्षा अधिक कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. एकूण 61 गावांना कोरोनाने वेढा दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.