Maval Corona Update : तालुक्यात विक्रमी 17 नवे रुग्ण तर 13 जणांना डिस्चार्ज 

एमपीसी​ न्यूज -​ मावळ तालुक्यात आज दिवसभरात तळेगाव दाभाडे 5, लोणावळा 1, सुदुंबरे 3, शिरगाव 1, कातवी 1, साई 1, वराळे 1, कान्हे 2 व कामशेत 2 अशा  ठिकाणी एकूण 17 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून एक दिवसांत पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णसंख्येचा हा उच्चांक ठरला आहे तसेच आज 13 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने हाही उच्चांक असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्यधिकारी चंद्रकांत लोहारे यांनी दिली. तालुक्यातील सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या 83 आहे. 

यामध्ये कान्हे येथे धुळे येथून आलेला 21 वर्षीय तरुण व कफ, उलट्याचा त्रास झालेला 50 वर्षीय पुरुष असे दोनजण, सुदुंबरे येथील एकाच कुटुंबातील 48 वर्षीय महिलेसह तिचे 34 व 24 वर्षीय दोन मुले असे तिघेजण,  कामशेत येथील पॉझिटिव्ह असलेल्या आईच्या संपर्कात आलेला 26 वर्षीय मुलगा यांचा समावेश आहे.

तसेच, कातवी येथील 54 वर्षीय पुरुष, वराळे येथील 50 वर्षीय पुरुष, शिरगाव येथील 35 वर्षीय पुरुष, साई येथील 29 वर्षीय पुरुष व लोणावळा येथील 37 वर्षीय पुरूष यांना लक्षणे आढळल्याने स्वॅब टेस्ट घेण्यात आली होती.

तळेगाव दाभाडे येथील चाकण येथे कामाला जाणारी 29 वर्षीय महिला, खाजगी रुग्णालयात कामाला असलेली 34 वर्षीय महिला डॉक्टर, कंपनीतील कोरोनाबधित मित्राच्या संपर्कात आलेले 48 वर्षीय व्यक्ती व लक्षणे आढळल्याने स्वॅब टेस्ट घेतलेले एक 56 वर्षीय व एक 32 वर्षीय व्यक्ती अशा पाच जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

यामुळे आजपर्यंत तालुक्यात आढळलेल्या एकूण रुग्णांची संख्या 170 झाली आहे. यापैकी आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला असून 79 जणांना घरी सोडण्यात आले आहे तर उर्वरित 83 रुग्णांवर उपचार सुरू आहे अशी माहिती तालुका आरोग्याधिकारी डाॅ चंद्रकांत लोहारे यांनी दिली.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीतील आजपर्यंत आढळलेल्या कोरोना रूग्णांची एकूण संख्या 52 झाली आहे. त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला असून 20 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर उर्वरित 29 रूग्ण उपचार घेत आहेत. अशी माहिती मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी सांगितली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.