Maval Corona Update : तालुक्यात दिवसभरात 174 नवे रुग्ण तर 134 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात सोमवारी (दि. 3) 174 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 134 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज शहरी भागात रुग्ण संख्येत वाढ झाली आहे.

आज एकही रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला नसुन आतापर्यंत 316 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1627 आहे. शहरी भागात 97 तर ग्रामीण भागात 77 रुग्ण आज सापडले.

आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 72 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 21 रुग्ण सापडले वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 4 रुग्ण सापडले .

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 13571 झाली आहे. तर दिवसभरात 134 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

सोमवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात भाजे 8, मळवली नामा 8, येलघोल 7, कोथुर्णे 7, कामशेत 6, सोमाटणे 4, पाटण 4, कुणे नामा 4, कान्हे 3 बेबड ओहळ 3, शिरगाव 3, बोरज 2, कांब्रे नामा 2, धनगव्हाण 2, नाणे 2, टाकवे बुद्रुक 2, ब्राम्हणवाडी (साते)2, ओझर्डे, मळवंडी ठुले, ताजे, वळक, शिवली, फळणे, उर्से व सांगावडे प्रत्येकी 1 असे एकूण 77 रुग्ण सापडले.

11628 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 316 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 4213, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 2719 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 806 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 7738 रुग्ण तर ग्रामीण भागात 5833 रुग्ण आढळून आले आहेत.

7 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 85.68 टक्के आहे तर मृत्यू दर 2.33 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 462, लोणावळा नगरपरिषद मध्ये 360, वडगाव नगरपंचायत मध्ये 58 व ग्रामीण भागात 747 असे एकूण 1627 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.