maval corona Update : मावळात आज 18 नवे रुग्ण ; 20 जणांना डिस्चार्ज

एमपीसीन्यूज – मावळ तालुक्यात दिवसेंदिवस रुग्ण संख्या कमी जास्त होत आहे.   तालुक्यात शुक्रवारी (दि . 30) कोरोनाचे 18 रुग्णांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात 20 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 209 मृत्यू झाले आहेत.

तालुक्यातील कोरोनाबधितांची एकूण संख्या 7428 झाली आहे. शुक्रवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 9  रुग्ण शहरी भागात तर 9 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये कामशेत 3, तळेगाव दाभाडे ग्रामीण, माळवाडी, सोमाटणे, कान्हे, सुदुंबरे, शिरगाव प्रत्येकी 1 असे एकूण 9  रुग्ण आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत 8 व लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1  असे एकूण 9  रुग्ण सापडले तर वडगाव नगरपंचायत हद्दीत आज एकही रुग्ण सापडला नाही. 198  रुग्ण सक्रिय आहेत. 7021  जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मावळ तालुक्यात आज कोरोनाने एकही मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 209  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 2154, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1472 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 511 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 4137 रुग्ण तर ग्रामीण भागात 3291  रुग्ण आढळून आले आहेत. 1  रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहरे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.