Maval Corona Update : आज दिवसभरात 180 नवे रुग्ण तर 161 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यात सोमवारी (दि.17) 180 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 161 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज दोन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, आतापर्यंत 340 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

आज ग्रामीण भागात रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. आतापर्यंत 340 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 2405 आहे.

शहरी भागात 80 तर ग्रामीण भागात 100 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 61 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 12 रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 07 रुग्ण सापडले.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 20557 झाली आहे. तर दिवसभरात 161रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. सोमवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात वराळे 19, महागाव 09,कडधे, मळवली प्रत्येकी 07, साळुंब्रे 05, चांदखेड 04, इंदोरी, प्रभाचीवाडी व सुदुंबरे प्रत्येकी 03, तळेगाव दाभाडे ग्रामीण, भाजे, बोरज, कामशेत, कोथुर्णे, कुसगाव पमा, लोहगड, नाणोली तर्फे चाकण, नवलाख उंब्रे, सांगावडे, शेवती, शिरगांव, सोमाटणे, टाकवे बुद्रुक प्रत्येकी 02, आर्डव, बेबडओव्हळ, धालेवाडी, दुधीवरे, कान्हे, माळवाडी, मोरमारवाडी, ओझर्डे, परंदवडी, पिंपळोली, सावंतवाडी, शिवणे प्रत्येकी 01असे एकूण 100 रुग्ण सापडले.

17463 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 340 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 6726, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 3654 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1074 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 11454 रुग्ण तर ग्रामीण भागात 9103 रुग्ण आढळून आले आहेत. 1 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 84.95 टक्के आहे तर मृत्यू दर 1.65 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 958 लोणावळा नगरपरिषद मध्ये 251 वडगाव नगरपंचायत मध्ये 100 व ग्रामीण भागात 1096 असे एकूण 2405 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.