Maval Corona Update : मावळ तालुक्यात आज 180 जणांना डिस्चार्ज; 101 नवीन रुग्णांची भर

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (गुरुवारी, दि. 24) कोरोनाचे 101 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यातील कोरोनाबधितांची एकूण संख्या 4 हजार 208 झाली आहे. तर दिवसभरात तब्बल 180 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 67 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 34 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. तळेगाव शहरात 34, लोणावळा शहरात 27 रुग्ण आढळले आहेत. वडगाव शहरात एकही रुग्ण आढळला नाही.

एकूण 4 हजार 208 रुग्णांमध्ये सध्या 854 रुग्ण सक्रीय आहेत. तर 3 हजार 218 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 136 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 1 हजार 286, लोणावळा नगरपरिषद 907 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 258 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 1 हजार 757 रुग्ण आढळून आले आहेत.

ग्रामीण भागात आढळलेले रुग्ण

गुरुवारी मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये तळेगाव दाभाडे ग्रामीण 8, कामशेत 6, माळवाडी 4, कुसगाव बु. 3, कुसगाव खु. 2, आर्डव 2, तुंग 2, कुरवंडे, इंदोरी, कान्हे, आंबी, वडिवळे, डोणे, चावसर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

मावळातील 60 गावांमध्ये 15 पेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहेत. तर 10 गावांमध्ये 15 पेक्षा अधिक कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. एकूण 70 गावांना कोरोनाने वेढा दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.