Maval Corona Update : दिवसभरात 181 नवे रुग्ण तर 91 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात शुक्रवारी (दि. 23) 181 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 91 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज रुग्ण संख्येच्या अर्धे रुग्ण बरे होऊन घरी गेले.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक रुग्ण होते आता लोणावळा नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक रुग्ण संख्या 352 आहे. आज एकही रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला नसुन आतापर्यंत 254 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. सक्रिय रुग्णांची संख्या 1329 आहे.

शहरी भागात 94 तर ग्रामीण भागात 87 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 51 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 41 रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 2 रुग्ण सापडले .

_MPC_DIR_MPU_II

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 12140 झाली आहे. तर दिवसभरात 91 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

शुक्रवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात बऊर 36, कामशेत 8, कुसगाव बुद्रुक 7, कान्हे 5, माऊ 5, करूंज 4, राजपुरी 3, बेडसे 3, जांबवडे 2, इंदोरी 2, आंबी, ब्राह्मणवाडी (साते), चिखलसे, जांभूळ, मोहितेवाडी, मोरमारवाडी, नानोली तर्फे चाकण, नवलाख उंब्रे, फळणे, टाकवे बुद्रुक,वराळे प्रत्येकी 1 असे एकूण 87 रुग्ण सापडले.

10557 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 254 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 3812, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 2398 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 749 रुग्ण सापडले आहेत.शहरी भागात 6959 रुग्ण तर ग्रामीण भागात 5181 रुग्ण आढळून आले आहेत. 6 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे.

कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 86.96 टक्के आहे तर मृत्यू दर 2.09 टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 266, लोणावळा नगरपरिषद मध्ये 352, वडगाव नगरपंचायत मध्ये 64 व ग्रामीण भागात 613 असे एकूण 1329 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.