Maval Corona Update : मावळात 185 नवे रुग्ण, 144 रुग्णांना डिस्चार्ज

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात मंगळवारी (दि.11) 185 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 144 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज शहरी भागात रुग्ण संख्येत वाढ झाली आहे.

आज तीन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. आतापर्यंत 325  रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 2375 आहे.

शहरी भागात 96 तर ग्रामीण भागात 89 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 41  रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 48 , तर वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत ७ रुग्ण सापडले .

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 16,385झाली आहे. तर दिवसभरात 144 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

मंगळवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात वराळे 13 , कामशेत 9, सोमाटणे 7, कुसगाव बुद्रुक 6, तळेगाव दाभाडे ग्रामीण 5, बेबड ओहळ 4, इंदोरी 4, कुरवंडे 3, मोरवे 3, नवलाख उंब्रे 3, उर्से 3, आढले बुद्रुक 2, आंबी 2, चांदखेड 2, केव्हरे 2, साळुंब्रे 2, सुदुंबरे 2, आंबळे, बेलज, देवघर, गहूंजे, मळवली, माळवाडी, नागाथली, नाणे, निगडे, फळणे, शिरगाव, सुदवडी, टाकवे बुद्रुक, टाकवे खुर्द, वळवंती व वाकसई प्रत्येकी 1 असे एकूण 89 रुग्ण सापडले.

13,685 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 325  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 5559, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 3133 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 899 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 9591 रुग्ण तर ग्रामीण भागात 6794 रुग्ण आढळून आले आहेत. 1 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 86.52 टक्के आहे तर मृत्यू दर 1.98  टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 750, लोणावळा नगरपरिषद मध्ये 453, वडगाव नगरपंचायत मध्ये 95 व ग्रामीण भागात 1077 असे एकूण 2375  रुग्ण आहेत, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.