Maval Corona Update : मावळात आज 208 जणांना डिस्चार्ज; 182 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात शुक्रवारी (दि.7) 182  रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 208 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज ग्रामीण भागात रुग्ण संख्येत वाढ झाली असून दोन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला.

सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1720 आहे. शहरी भागात 65 तर ग्रामीण भागात 117  रुग्ण आज सापडले.

आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 40 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 23 रुग्ण सापडला. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 2 रुग्ण सापडले .

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या15,143 झाली आहे. तर दिवसभरात 208 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

शुक्रवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात इंदोरी 11, वराळे 11, कामशेत 10, कुणे नामा 9, साळुंब्रे 9, नवलाख उंब्रे 6, सोमाटणे 5, नाणे 5, कुरवंडे 4, सुदुंबरे 4, पाचाणे 4, कुसगाव बुद्रुक 3, आंबी 3, उर्से 3,आंबळे 2, ब्राम्हणवाडी 2, साते 2, जांभवडे 2,  मोरमारवाडी 2, कान्हे, जांभूळ, साते, टाकवे बुद्रुक, पाथरगाव, पाले नामा, गोवित्री, परंदवडी, सुदवडी, नानोली तर्फे चाकण, बेबडओहळ, वेहेरगाव, टाकवे खुर्द, शिलाटणे, भोयरे, शिरदे, ब्राम्हणवाडी, करंजगाव, निगडे, नायगाव व चिखलसे प्रत्येकी 1 असे एकूण 117 रुग्ण सापडले.

13,101 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 322 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 5089, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 2941 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 831  रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 8861 रुग्ण तर ग्रामीण भागात 6282  रुग्ण आढळून आले आहेत. 2 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 86.52 टक्के आहे तर मृत्यू दर 2.13 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 490, लोणावळा नगरपरिषद मध्ये 384, वडगाव नगरपंचायत मध्ये 55 व ग्रामीण भागात 791 असे एकूण 1720 रुग्ण आहेत, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड
समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.