Maval Corona Update : मावळ तालुक्यात आज कोरोनाचे 21 नवीन रुग्ण

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (रविवारी, दि. 18) 21 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले तर 30 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या तालुक्यात 418 सक्रिय रुग्ण आहेत.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 10 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 11 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. तळेगाव शहरात 6, लोणावळा शहरात 3, वडगाव शहरात 1 रुग्ण आढळले आहेत.

रविवारी मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये वराळे 3, वरसोली 3, सोमाटणे 2, तळेगाव दाभाडे (ग्रामीण), कुसगाव बु, गहूंजे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. मावळातील 32 गावांमध्ये 15 पेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहेत. तर 5 गावांमध्ये 15 पेक्षा अधिक कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. एकूण 37 गावांना कोरोनाने वेढा दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.