Maval Corona Update : कोरोनाचे तब्बल 225 नवीन रुग्ण; 75 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (रविवारी)  तब्बल 225 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यातील कोरोनाबधितांची एकूण संख्या 3 हजार 834 झाली आहे. तर दिवसभरात 75 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

लोणावळा (महिला, 69 वर्ष) येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 144 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 81 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. तळेगाव शहरात 91, लोणावळा शहरात 53 रुग्ण आढळले आहेत. वडगावात एकाही रुग्णाची दिवसभरात नोंद झाली नाही.

एकूण 3 हजार 834 रुग्णांमध्ये सध्या 1 हजार 43 रुग्ण सक्रीय आहेत. तर 2 हजार 666 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 125 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 1 हजार 200, लोणावळा नगरपरिषद 789 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 229 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 1 हजार 616 रुग्ण आढळून आले आहेत.

ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक

मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. 1 हजार 616 रुग्णांची ग्रामीण भागात नोंद झाली आहे. रविवारी मावळ तालुक्यातील कुरवंडे 13, कुसगाव बु 12, इंदोरी 9, तळेगाव दाभाडे ग्रामीण 8, चांदखेड 4, सुदवडी 4, माळवाडी 3, कामशेत 3, कुणे ना मा 3, वरसोली 3, कडधे 2, वराळे 2, टाकवे, सोमाटणे, ब्राह्मणवाडी (साते), साते, दहिवली, नवलाख उंब्रे, कांब्रे ना मा, चिखलसे, मळवली ना मा, वाकसाई, कार्ला, ताजे, इंगळूण, पवळेवाडी, वडवली येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

मावळातील 68 गावांमध्ये 15 पेक्षा कमी रुग्ण आहेत. तर 9 गावांमध्ये 15 पेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. एकूण 77 गावांना कोरोनाने वेढा दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.