Maval Corona Update: मावळ तालुक्यात रविवारी 24 नवीन रुग्ण; 45 जणांना डिस्चार्ज

Maval Corona Update: 24 new patients in Maval taluka on Sunday; Discharge of 45 persons एकूण 1 हजार 386 रुग्णांमध्ये सध्या 396 रुग्ण सक्रिय आहेत. तर 939 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 51 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (दि.16) कोरोनाचे 24 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाबधितांची एकूण संख्या 1 हजार 386 झाली आहे. तर दिवसभरात 45 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 18 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 6 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये वराळे, नायगाव येथील प्रत्येकी दोन, कामशेत, गहुंजे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

तळेगाव शहरात 13, लोणावळा शहरात 1 आणि वडगावमध्ये 4 रुग्णाची नोंद झाली आहे.

एकूण 1 हजार 386 रुग्णांमध्ये सध्या 396 रुग्ण सक्रिय आहेत. तर 939 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 51 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 453, लोणावळा नगरपरिषद 147 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 105 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 681 रुग्ण आढळून आले आहेत.

सध्या रुग्णालयात 392 आणि होम आयसोलेशनमध्ये 4 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.