Maval Corona Update : मावळ तालुक्यात आज कोरोनाचे 24 नवीन रुग्ण

तालुक्यातील कोरोनाबधितांची एकूण संख्या 1 हजार 908 झाली आहे.24 new patients of Corona in Maval taluka today

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (शनिवारी) कोरोनाचे 24 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबधितांची एकूण संख्या 1 हजार 908 झाली आहे.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 15 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 9 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये कामशेत, कान्हे, सुदुंबरे,उंबरे नवलाख, चिखलसे, बेबडओहळ, नाणे, पुसाणे, तळेगाव दाभाडे (ग्रामीण) येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.

तळेगाव शहरात 13 रुग्ण आढळले आहेत. वडगाव शहरात दोन, तर लोणावळा शहरात एकाही रुग्णाची नोंद झाली नाही.

एकूण 1 हजार 908 रुग्णांमध्ये सध्या 452 रुग्ण सक्रीय आहेत. तर 1 हजार 380 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 76 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 662, लोणावळा नगरपरिषद 216 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 126 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 904 रुग्ण आढळून आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.