Maval Corona Update : मावळ तालुक्यात आज कोरोनाचे 26 नवीन रुग्ण

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 11 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 15 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (शुक्रवारी, दि. 4) कोरोनाचे 26 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाबधितांची एकूण संख्या 2 हजार 177 झाली आहे. तर दिवसभरात 5 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शुक्रवारी कशाळ (पुरुष, 56 वर्ष) येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 11 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 15 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये कामशेत 7, शिरगाव, काले येथील प्रत्येकी दोन, वराळे, डोंगरगाव, देवले, नाणोली ना मा येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.

तळेगाव शहरात 6 आणि वडगावमध्ये 5 रुग्ण आढळले आहेत.

एकूण 2 हजार 177 रुग्णांमध्ये सध्या 528 रुग्ण सक्रीय आहेत. तर 1 हजार 565 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 84 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 750, लोणावळा नगरपरिषद 268 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 150 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 1009 रुग्ण आढळून आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.