Maval Corona Update: दिवसभरात 27 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 336 वर

Maval Corona Update: 27 new patients in a day, number of corona patients at 336 तळेगाव दाभाडे येथे 6 रुग्ण, सोमाटणे,आढले व कामशेत येथे प्रत्येकी 04 रुग्ण तर वराळे व लोणावळा येथे प्रत्येकी 02 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या तीनने घटली असून दिवसभरात 27 नवीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये तळेगाव, लोणावळा, सोमाटणे, वराळे, साते, शिळीम, गहुंजे, इंदोरी, नवलाख उंब्रे, आढले, कामशेत येथील रुग्णांचा समावेश असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्यधिकारी चंद्रकांत लोहारे यांनी दिली.

इंदोरी, गहुंजे, नवलाख उंब्रे, साते, शिळीम येथे प्रत्येकी एक रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे तर तळेगाव दाभाडे येथे 6 तर सोमाटणे, आढले व कामशेत येथे प्रत्येकी  04 रुग्ण आढळले आणि वराळे व लोणावळा येथे प्रत्येकी 02 आहेत. असे एकूण 27 रुग्ण आज दिवसभरात पॉझिटिव्ह आढळले आहेत. दररोज आढळणाऱ्या नवीन रुग्णसंख्येच्या तुलनेत आज नवीन रुग्णांची संख्या तीनने घटलेली दिसते. आज अखेर 13 जण बरे झाल्याने त्यांना घरीसोडण्यात आले.

तळेगाव फ्लॅट नं 108 रुबी 25 कॅरेट सोसायटी मधील महिला वय 22 वर्ष,  विद्या विहार,रेनो कॉलनी पुरूष 28 वर्ष, तेली आळी,पुरुष वय 25 वर्ष, स्वराज नगरी, पुरुष वय 32 वर्ष, 108 रुबी 25 कॅरेट सोसायटी पुरुष वय 25 वर्ष,प्लॉट नंबर 8,शुभारंभ सोसायटी,पुरुष वय 51 वर्षे, यामध्ये दोन कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे तर बाकीचे चार रुग्ण संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये उपचारासाठी ठेवण्यात आले आहे

आजअखेर तालुक्यातील कोरोनाबधित रुग्णांची संख्या 336 झाली असून यापैकी नऊ जणांचा मृत्यू तर 148 जणांना घरी सोडण्यात आले आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 179 असून यापैकी 132 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर 47 जणांवर होम क्वारंटाईन करून उपचार सुरू आहेत अशी माहिती वैद्यकीय अधिकारी गुणेश बागडे यांनी दिली.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीतील आजपर्यंत आढळलेल्या कोरोना रूग्णांची संख्या 99 असून त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला असून 46 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 50 जण उपचार घेत आहेत. अशी माहिती मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.