Maval Corona Update: दिवसभरात सर्वाधिक 28 नवे रुग्ण, सुदुंबरेच्या NDRF कॅम्पमधील 16 जण पॉझिटिव्ह

Maval Corona Update: 28 new patients in a day, 16 from NDRF Camp in Sudumbare tested positive एकूण 220 कोरोनाबाधितांपैकी 83 जणांची कोरोनावर मात तर 9 जणांचा मृत्यू, 88 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज दिवसभरात सुदुंबरे येथील 16, कान्हे फाटा 4, वडगाव व साई येथे प्रत्येकी 02, तर लोणावळा, कामशेत, तळेगाव व इंदोरी येथील प्रत्येकी 01 या ठिकाणी एकूण 28 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून एका दिवसांत पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णसंख्येचा हा उच्चांक ठरला आहे तसेच आज NDRF कॅम्पमधील 16 रुग्णांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. हाही उच्चांक असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्यधिकारी चंद्रकांत लोहारे यांनी दिली.

यामध्ये सुदुंबरे येथील NDRF कॅम्पमधील 21 ते 50 वर्षीय 16 व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळलेल्या नजिकच्या संपर्कातील असल्याने काल स्वॅब घेण्यात आला होता. आज रोजी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. त्या सर्वांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे.

यामध्ये कान्हे येथील पाॅझिटिव्ह आढळलेल्या 50 वर्षीय व्यक्तीच्या निकटच्या संपर्कातील पत्नी वय 45, मुलगी 25 व 23 व 12 वर्षीय मुलगा असल्याने ते पाॅझिटिव्ह आले आहेत.

साई येथील 20 वर्षीय व्यक्ती व 80 वर्षीय महिला हे दोघे  बाधित  29 वर्षीय व्यक्तीच्या जवळच्या संपर्कातील असल्याने पाॅझिटिव्ह आले आहेत. जनरल हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल आहेत.

वडगाव येथील टाटा सोसायटीमधील 24 वर्षीय 02 व्यक्ती अगोदर पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीच्या निकटच्या संपर्कातील आहेत. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.

इंदोरी येथील प्रगतीनगर मधील  42 वर्षीय महिलेला लक्षणे आढळल्याने खाजगी लॅबमध्ये स्वॅब घेतला होता. आज रोजी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.

कामशेत येथील 48 वर्षीय व्यक्ती डाॅक्टरचा अगोदर पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीशी संपर्क आल्याने  पाॅझिटिव्ह आला आहे. त्यांना स्वगृही विलगीकरण करण्यात आले. तसेच तळेगाव दाभाडे येथील शिंदेवस्तीतील 26 वर्षीय व्यक्ती व लोणावळा येथील 39 वर्षीय व्यक्ती डाॅक्टर हे दोघेही पाॅझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कातील असल्याने पाॅझिटिव्ह आले आहेत.

यामुळे आजपर्यंत आढळलेल्या एकूण रुग्णांची संख्या 220 झाली आहे. यापैकी आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला असून 83 जणांना घरी सोडण्यात आले आहे तर उर्वरित 88 रुग्ण रूग्णालयात आहेत तर  स्वगृही विलगीकरण करण्यात आलेले 40 जण आहेत. अशी माहिती वैद्यकीय अधिकारी गुणेश बागडे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.