Maval Corona Update : दिवसभरात 281 नवे रुग्ण तर 164 जणांना डिस्चार्ज 

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात सोमवारी (दि.10) 281 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 164 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज शहरी भागात रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. आज एकही रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला नसुन आतापर्यंत 322 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 2266 आहे.

शहरी भागात 148 तर ग्रामीण भागात 133 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 111 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 36 रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 1 रुग्ण सापडला.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 16129 झाली आहे. तर दिवसभरात 164 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. सोमवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात सोमाटणे 18, कामशेत 8,कार्ला 8, कुसगाव बुद्रुक 8, वराळे 7, इंदोरी 6, जवन 6, नवलाख उंब्रे 6, पुसाणे 4, तळेगाव दाभाडे ग्रामीण 3, आढले बुद्रुक 3, औंढोली 3, उर्से 3, चांदखेड 3, करूंज 3, साळुंब्रे 3, येलघोल 3, औंढे खुर्द 2, बेबड ओहळ 2, बोरज 2, डोंगर गाव 2, जांभवडे 2, कान्हे 2, कुणे नामा 2, वळवंती 2, आढले खुर्द, आंबी, भाजे, डाहुली, धामणे, दुधीवरे, घोणशेत, जांभूळ, कोथुर्णे, कुसवली, लोहगड, महागाव, मळवली, नाणे, काले, साई, टाकवे बुद्रुक, टाकवे खुर्द, उकसान, वेहरगाव, वाकसई व नानोली तर्फे चाकण प्रत्येकी 1 एकूण 133 रुग्ण सापडले.

13541 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 322 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 5467, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 3085 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 872 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 9424 रुग्ण तर ग्रामीण भागात 6705 रुग्ण आढळून आले आहेत. 1 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे.

कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 83.95 टक्के आहे तर मृत्यू दर 2 टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 698, लोणावळा नगरपरिषद मध्ये 447, वडगाव नगरपंचायतमध्ये 81 व ग्रामीण भागात 1040 असे एकूण 2266 रुग्ण आहेत, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.