Maval Corona Update : मावळ तालुक्यात सोमवारी 29 नवीन रुग्ण; 42 जणांना डिस्चार्ज

कोरोनाबधितांची एकूण संख्या 1 हजार 415 झाली आहे. : 29 new patients in Maval taluka on Monday; 42 discharged

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (सोमवारी, दि. 17) कोरोनाचे 29 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाबधितांची एकूण संख्या 1 हजार 415 झाली आहे. तर दिवसभरात 42 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज दिवसभरात दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेले रुग्ण उर्से (महिला, 78 वर्ष), तळेगाव स्टेशन (महिला, 72 वर्ष) येथील आहेत.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 15 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 14 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये कामशेत येथील चार, नायगाव येथील दोन, माळवाडी, कुसगाव बु, इंदोरी, देवले, काले, नाणे, मुढावरे, औंढे खु. येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

तळेगाव शहरात 10, लोणावळा शहरात 4 आणि वडगावमध्ये 1 रुग्णाची नोंद झाली आहे.

एकूण 1 हजार 415 रुग्णांमध्ये सध्या 381 रुग्ण सक्रीय आहेत. तर 981 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 53 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 463, लोणावळा नगरपरिषद 151 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 106 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 695 रुग्ण आढळून आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.