Maval Corona Update : मावळात 3 पॉझिटिव्ह; 7 जणांना डिस्चार्ज

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात दिवसेंदिवस रुग्ण संख्या कमी जास्त होत आहे. तालुक्यात सोमवारी (दि.10) 3 रुग्णांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात 7 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 212 मृत्यू झाले आहेत.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद व वडगाव नगरपंचायत हद्दीत आज एकही रुग्ण सापडला नाही. सध्या रुग्णालयात 77 रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 7538 झाली आहे. तर दिवसभरात 7 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मंगळवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 01 रुग्ण शहरी भागात तर 2 रुग्ण ग्रामीण भागात सापडले.

ग्रामीण भागात तळेगाव दाभाडे (ग्रामीण) व शिरगांव प्रत्येकी 1 असे एकूण 2 रुग्ण सापडले. तर शहरी भागात लोणावळा नगरपरिषद हद्दीत एक असे एकूण 3 रूग्ण सापडले.77 रुग्ण सक्रिय आहेत. 7249 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मावळ तालुक्यात आज एकही मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 212 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 2192, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1501 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 518 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 4211 रुग्ण तर ग्रामीण भागात 3327 रुग्ण आढळून आले आहेत. एकाही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.