Maval Corona Update: मावळात आज 30 नव्या रुग्णांची नोंद; 7 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यात सोमवारी (दि.1) 30 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर दिवसभरात 07 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. सक्रिय रुग्णांची संख्या 122 आहे.

लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 14 रूग्ण व वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत आज 01 रुग्ण सापडला तर तळेगाव नगरपरिषदेच्या हद्दीत 09 रूग्ण सापडले. सध्या रुग्णालयात 112 रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 8331 झाली आहे. तर दिवसभरात 07 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सोमवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये शहरी भागात 24 रुग्ण सापडले तर ग्रामीण भागात कुरवंडे, कान्हे, इंगळुन सोमाटणे, शिरगांव व दारूंब्रे येथे प्रत्येकी एक 01 रूग्ण सापडला. ग्रामीण भागात 06 रुग्ण सापडले तर शहरी भागात 24 रुग्ण सापडले. सध्या 122 रुग्ण सक्रिय आहेत. 7977 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मावळ तालुक्यातील आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 232 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 2557, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1646 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 551 रुग्ण सापडले आहेत.

आजपर्यंत मावळ तालुक्यातील शहरी भागात 4754 रुग्ण तर ग्रामीण भागात 3577 रुग्ण आढळून आले आहेत. एकाही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.