Maval Corona Update : तालुक्यात आज 32 जणांना डिस्चार्ज,  40 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात गुरुवारी (दि.29) 40 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 32 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही,आतापर्यंत 515 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 483 आहे. शहरी भागात 20 तर ग्रामीण भागात 20 रुग्ण आज सापडले.आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 14 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 5 रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 1 रुग्ण सापडला.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 25,818 झाली आहे. तर दिवसभरात 32 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. गुरुवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात कार्ला 5, उर्से 2, कुरवंडे 2, कामशेत, शिरगाव, चिखलसे, जांभवडे, वराळे, औंढोली, माळवाडी, सोमवडी, जांभुळ, आंबी व ओझर्डे प्रत्येकी 1 असे एकूण 20 रुग्ण सापडले.

24,820 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 515 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 8,172 लोणावळा नगरपरिषद हद्दीत 4,319 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1292 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 13,783 रुग्ण तर ग्रामीण भागात 12,035 रुग्ण आढळून आले आहेत. 1 रुग्णाची परिस्थिती गंभीर आहे.

कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 96.13 टक्के आहे तर मृत्यू दर 1.99 टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 141 लोणावळा नगरपरिषद मध्ये 70 वडगाव नगरपंचायत मध्ये 12 व ग्रामीण भागात 260 असे एकूण 483 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.