Maval Corona Update : दिवसभरात 34 नवे रुग्ण तर 15 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यात शुक्रवारी (दि.12) 34 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर दिवसभरात 15 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. सक्रिय रुग्णांची संख्या 186 आहे.

आज लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 02 रुग्ण सापडले तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 07 रुग्ण सापडले तर वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 04 रुग्ण सापडले. सध्या रुग्णालयात 186 रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 8519 झाली आहे. तर दिवसभरात 15 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शुक्रवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये शहरी भागात 13 रुग्ण सापडले तर ग्रामीण भागात तळेगाव दाभाडे ग्रामीण येथे 12 तर सोमाटणे, इंदोरी व कामशेत येथे प्रत्येकी 01रूग्ण सापडला तर सुदुंबरे येथे 02 रुग्ण तर कडधे येथे 04 रूग्ण सापडले. 8102 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. मावळ तालुक्यातील आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 232 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 2627, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1664 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 567 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 4858 रुग्ण तर ग्रामीण भागात 3661रुग्ण आढळून आले आहेत. एकाही रुग्णांची परिस्थि ती गंभीर नाही अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.