Maval Corona Update: मावळ तालुक्यात आणखी 40 रुग्णांची नोंद, एकाचा मृत्यू; एकूण रुग्णसंख्या 591

Maval Corona Update: 40 more patients registered in Maval taluka, one dies; Total number of patients 591 आज आढळलेल्या 40 रुग्णांपैकी 18 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 22 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (दि. 26) आणखी 40 रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे एकूण रुग्णसंख्या 591 झाली आहे. तर रविवारी 12 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत मावळ तालुक्यात 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मावळ तालुक्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. आज आढळलेल्या 40 रुग्णांपैकी 18 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 22 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

यामध्ये तळेगाव दाभाडे ग्रामीण (4), कामशेत, वराळे, सोमाटणे, कान्हे, काम्ब्रे या गावात प्रत्येकी दोन तर इंदोरी, गहुंजे, सुदुंबरे, बधलवाडी, साते, नायगाव, चिखलसे आणि बोरज या गावांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.

सध्या मावळ तालुक्यात 365 रुग्ण सक्रिय आहेत. सक्रिय रुग्णांमध्ये 183 रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये दाखल असून 182 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. 365 रुग्णांपैकी 191 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली आहेत. तर 174 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळलेली नाहीत.

212 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. 14 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेला रुग्ण वराळे गावठाण येथील 75 वर्षीय पुरुष होता. या रुग्णाला दम लागण्याचा त्रास होता. 7 जुलै रोजी या रुग्णाने चाकण येथे आणि 11 जुलै रोजी चाकण येथून वराळे येथे प्रवास केला होता.

त्यानंतर त्यांना त्रास होऊ लागल्याने 23 जुलै रोजी रुग्णालयात भरती करण्यात आले. कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले. मात्र रिपोर्ट येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर आलेल्या अहवालात त्या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे समजले.

तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 591 झाली असून त्यात तळेगावातील सर्वाधिक 173, लोणावळा येथील 47 तर वडगाव येथील 35 जणांचा समावेश आहे. तालुक्यात आत्तापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. 212 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

रविवारी 12 जणांना घरी सोडण्यात आले. सध्या 365 सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील 183 जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असून 182 जण गृहविलगीकरणात असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीतील आजपर्यंत आढळलेल्या कोरोना रूग्णांची संख्या 172 असून त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला असून 61 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 108 जण उपचार घेत आहेत. पैकी 45 जण गृहविलगीकरणात आहेत अशी माहिती मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.