Maval Corona Update : मावळ तालुक्यात 40 नवीन रुग्णांची नोंद; 14 जणांना डिस्चार्ज

40 new patients registered in Maval taluka; Discharged 14 people

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (गुरुवारी, दि. 13) कोरोनाचे 40 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाबधितांची एकूण संख्या 1 हजार 295 झाली आहे. तर दिवसभरात 14 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दोन रुग्णांचा आज दिवसभरात मृत्यू झाला आहे.

आज मृत्यू झालेले रुग्ण पिंपळेखुटे (महिला, 57 वर्ष), वडगाव (पुरुष, 60 वर्ष) येथील आहे.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 22 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 18 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये कामशेत, धामणे येथील प्रत्येकी तीन, उर्से, इंदोरी येथील प्रत्येकी दोन आणि कुसगाव बु., वराळे, कान्हे, बऊर, वडेश्वर, देवघर, बेबडओहळ, शिवणे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

>तळेगाव शहरात 14, लोणावळा शहरात 4 आणि वडगावमध्ये 4 रुग्णांची नोंद झाली आहे.

एकूण 1 हजार 295 रुग्णांमध्ये सध्या 409 रुग्ण सक्रीय आहेत. तर 838 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 420, लोणावळा नगरपरिषद 140 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 97 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 638 रुग्ण आढळून आले आहेत.

सध्या रुग्णालयात 387 आणि होम आयसोलेशनमध्ये 22 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.