Maval Corona Update : तालुक्यात 44 नवे रुग्ण तर 66 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील रुग्ण संख्येत घट झाली असुन रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. मावळ तालुक्यात शुक्रवारी (दि.12) 44 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 66 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज ग्रामीण भागात रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नसुन, आतापर्यंत 450 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 645 आहे.

शहरी भागात 16 तर ग्रामीण भागात 28 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 09 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषद हद्दीत 02 रुग्ण सापडले, वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 05 रुग्ण सापडले.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 22,773 झाली आहे. तर दिवसभरात 66 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. शनिवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात ताजे व कार्ला प्रत्येकी 04, कुणे नामा, साळुंब्रे, गहूंजे, आंबी, शिरगाव, मळवंडी ठुले व कामशेत प्रत्येकी 02, टाकवे बुद्रुक, कुसवली, कान्हे, सुदुंबरे, काले भाजे प्रत्येकी 01 असे एकूण 28 रुग्ण सापडले.

21,678 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 450 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 7,305 लोणावळा नगरपरिषद हद्दीत 3890 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1173 रुग्ण सापडले आहेत.शहरी भागात 12,368 रुग्ण तर ग्रामीण भागात 10,405 रुग्ण आढळून आले आहेत. 04 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 95.19 टक्के आहे तर मृत्यू दर 1.98 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 136 लोणावळा नगरपरिषदमध्ये 43 वडगाव नगरपंचायत मध्ये 27 व ग्रामीण भागात 439 असे एकूण 645 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.