Maval Corona Update: तालुक्यात रविवारी कोरोनाचे 45 नवीन रुग्ण, चौघांचा मृत्यू

Maval Corona Update: 45 new corona patients in Maval taluka on Sunday तळेगाव शहरात 9, लोणावळा शहरात 6 आणि वडगावमध्ये 3 रुग्णांची नोंद झाली आहे.

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात कोरोना बधितांचा आकडा एक हजाराच्या पुढे गेला आहे. आज (दि.9) कोरोनाचे 45 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाबधितांची एकूण संख्या 1 हजार 109 झाली आहे. तर दिवसभरात 54 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तालुक्यात चार कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 18 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 27 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये कामशेत, माऊ, उर्से, धामणे, इंदोरी, वाकसाई, ब्राह्मणवाडी (साते), कान्हे, शिरगाव, चिखलसे, वाहनगाव येथील प्रत्येकी एक, नवलाख उंबरे, सुदुंबरे येथील प्रत्येकी दोन, शिवणे, बेबडओहळ, गहूंजे, वराळे येथील प्रत्येकी तीन रुग्णाचा समावेश आहे.

तळेगाव शहरात 9, लोणावळा शहरात 6 आणि वडगावमध्ये 3 रुग्णांची नोंद झाली आहे.

एकूण 1 हजार 109 रुग्णांमध्ये सध्या 389 रुग्ण सक्रिय आहेत. तर 685 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 364, लोणावळा नगरपरिषद 118 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 77 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 563 रुग्ण आढळून आले आहेत.

आज मृत्यू झालेले रुग्ण सुदुंबरे (पुरुष 97 वर्ष), ब्राह्मणवाडी (पुरुष 57 वर्ष), ब्राह्मणवाडी (पुरुष 67 वर्ष), तळेगाव दाभाडे (महिला 64 वर्ष) येथील आहेत.

सध्या रुग्णालयात 365 आणि होम आयसोलेशनमध्ये 24 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.