Maval Corona Update : तालुक्यात दिवसभरात 45 नवे रुग्ण तर 22 जणांना डिस्चार्ज 

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात बुधवारी (दि.23) 45रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 22 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 491 इतकी आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 707 आहे.

शहरी भागात 12 तर ग्रामीण भागात 33 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत आज एकही रुग्ण सापडला नाही. लोणावळा नगरपरिषद हद्दीत 11 रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 1 रुग्ण सापडले. तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 23,459 झाली आहे. तर दिवसभरात 22 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

बुधवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात वराळे 6, कामशेत 4, कान्हे 3, नवलाख उंब्रे 3, टाकवे बुद्रुक 2, भाजे 2, साते, देवघर, बेलज, ताजे, मोरवे, वेहरगाव, जांभूळ, सुदवडी, नानोली तर्फे चाकण, आंबळे, माळवाडी, साळुंब्रे व शिलाटणे प्रत्येकी 1 असे एकूण 33 रुग्ण सापडले. तालुक्यात आतापर्यंत 22,260 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 491 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 7,499 लोणावळा नगरपरिषद हद्दीत 3,968 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1200 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 12,667 रुग्ण तर ग्रामीण भागात 10,792 रुग्ण आढळून आले आहेत. 3 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 94.89 टक्के आहे तर मृत्यू दर 2.09 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 198, लोणावळा नगरपरिषदमध्ये 77, वडगाव नगरपंचायतमध्ये 34 व ग्रामीण भागात 398असे एकूण 707 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.