Maval Corona Update: 46 जणांनी कोरोनावर विजय मिळवत साजरी केली विजयादशमी

मावळात दिवसभरात फक्त चार रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात सर्वात कमी रुग्ण होत असून शहरी भागात केवळ 1 रुग्ण सापडला. नागरिकांनी सुटकेचा निःश्वास घेतला आहे. मावळ तालुक्यात  रविवार (दि.25) कोरोनाचे 4 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. रविवारी एकही रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 196 मृत्यू झाले आहेत.  

तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 7367 झाली आहे. तर दिवसभरात 46 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

रविवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 01 रुग्ण शहरी भागात तर 03 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये  कुसगाव बुद्रुक, सोमाटणे व शिरगाव प्रत्येकी 01असे एकूण 03 रुग्ण आहे .

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत 01, तर लोणावळा नगरपरिषद व  वडगाव नगरपंचायत हद्दीत आज एकही रुग्ण सापडला नाही. 287 रुग्ण सक्रिय आहेत.

6884 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला.मावळ तालुक्यात आज एकही रुग्णाचा मृत्यू झाला नसून आतापर्यंत 196 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 2137, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1468 व  वडगाव नगरपंचायत हद्दीत 506 रुग्ण सापडले आहेत .  शहरी भागात 4111 रुग्ण तर ग्रामीण भागात  3256 रुग्ण आढळून आले आहेत. दोन  रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे.

तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहरे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी ही माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.