Maval Corona Update : मावळात कोरोनाचे 460 रुग्ण; 51 जणांना डिस्चार्ज, 31 नवे रुग्ण

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात मंगळवारी (दि.27) 31 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 51 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही, आतापर्यंत 501 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 460 आहे.

मावळच्या शहरी भागात 13 तर ग्रामीण भागात 18 रुग्ण आज सापडले.आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 08 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 02 रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 03 रुग्ण सापडले.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 25,721 झाली आहे. तर दिवसभरात 51रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

मंगळवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात पवळेवाडी 03, दारुंब्रे, शिरगाव, कामशेत, कुसगाव खुर्द व खडक गेव्हंडे प्रत्येकी 02, कोळे चाफेसर, चिखलसे, कोंडीवडे आमा, वराळे व कुरवंडे प्रत्येकी 01 असे एकूण 18 रुग्ण सापडले.

मावळत आतापर्यंत 24,769 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 501 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 8,140 लोणावळा नगरपरिषद हद्दीत 4,305 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1287 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 13,732 रुग्ण तर ग्रामीण भागात 11,989 रुग्ण आढळून आले आहेत. 01 रुग्णाची परिस्थिती गंभीर आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 96.26 टक्के आहे तर मृत्यू दर 1.95 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 127 लोणावळा नगरपरिषदमध्ये 71 वडगाव नगरपंचायतमध्ये 12 व ग्रामीण भागात 250असे एकूण 460 रुग्ण आहेत, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'879062ef4c1c615f',t:'MTcxMzkwMTg2OS4yMTgwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();