Maval Corona Update : मावळ तालुक्यात आज 47 नवीन रुग्णांची नोंद; 37 जणांना डिस्चार्ज

तालुक्यात कोरोनाबधितांची एकूण संख्या 1 हजार 342 झाली आहे. ; 47 new patients registered in Maval taluka today; Discharged 37 people

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (शुक्रवारी, दि. 14) कोरोनाचे 47 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाबधितांची एकूण संख्या 1 हजार 342 झाली आहे. तर दिवसभरात 37 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज मृत्यू झालेले रुग्ण तळेगाव दाभाडे (महिला, 83 वर्ष), (पुरुष, 70 वर्ष) येथील आहे.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 23 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 24 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये इंदोरी येथील 10, कामशेत येथील चार, वराळे येथील तीन, धामणे, सोमाटणे, कान्हे येथील प्रत्येकी दोन, कुसगाव बु. येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

तळेगाव शहरात 17, लोणावळा शहरात 5 आणि वडगावमध्ये 1 रुग्णाची नोंद झाली आहे.

एकूण 1 हजार 342 रुग्णांमध्ये सध्या 418 रुग्ण सक्रीय आहेत. तर 874 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 49 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 437, लोणावळा नगरपरिषद 145 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 98 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 662 रुग्ण आढळून आले आहेत.

सध्या रुग्णालयात 413 आणि होम आयसोलेशनमध्ये 5 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.