मंगळवार, डिसेंबर 6, 2022

Maval Corona Update: तालुक्यात कोरोनाचे 48 नवीन रुग्ण; 49 रुग्णांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (मंगळवारी) 48 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यातील कोरोनाबधितांची एकूण संख्या 5 हजार 58 झाली आहे. तर दिवसभरात 49 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कुसगाव बुद्रुक (पुरुष, 70 वर्ष) येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 27 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 21 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. तळेगाव शहरात 14, लोणावळा शहरात 7, वडगाव शहरात 6 रुग्ण आढळले आहेत.

एकूण 5 हजार 58 रुग्णांमध्ये सध्या 612 रुग्ण सक्रिय आहेत. तर 4 हजार 273 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 173 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 1 हजार 521, लोणावळा नगरपरिषद 1 हजार 140 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 309 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 2 हजार 88 रुग्ण आढळून आले आहेत.

ग्रामीण भागात आढळलेले रुग्ण

मंगळवारी मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये तळेगाव दाभाडे ग्रामीण 8, कामशेत 5, टाकवे बु 2, माळवाडी, कुसगाव बु, वराळे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. मावळातील 44 गावांमध्ये 15 पेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहेत. तर 6 गावांमध्ये 15 पेक्षा अधिक कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. एकूण 50 गावांना कोरोनाने वेढा दिला आहे.

Latest news
Related news