Maval Corona Update : मावळात 49 नवे रुग्ण, 39 जणांना डिस्चार्ज

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात शनिवारी (दि.24) 49 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 39 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही, आतापर्यंत 501 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 498 आहे.

मावळच्या शहरी भागात 23 तर ग्रामीण भागात 26 रुग्ण आज सापडले. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 18 रुग्ण, लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 05 रुग्ण , तर वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत आज एकही रुग्ण सापडला नाही.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 25,604 झाली आहे. तर दिवसभरात 39रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

शनिवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात सोमाटणे 04, कान्हे, चांदखेड, कामशेत प्रत्येकी 02, जवण, कशाळ, तळेगाव दाभाडे ग्रामीण, धामणे, कुसगाव पमा, दारुंब्रे, नाणे, कुणेनामा, चिखलसे, कल्हाट, गोडुंब्रे, ओझर्डे, सुदुंबरे, सुदवडी, निगडे व इंदोरी येथे प्रत्येकी 01असे एकूण 26 रुग्ण सापडले.

मावळातआतापर्यंत 24,605 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 501 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 8115, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 4295 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1284 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 13,694 रुग्ण तर ग्रामीण भागात 11,910 रुग्ण आढळून आले आहेत. एका रुग्णाची परिस्थिती गंभीर आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 96.01 टक्के आहे तर मृत्यू दर 1.96 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषदमध्ये 150 लोणावळा नगरपरिषदमध्ये 97 वडगाव नगरपंचायतमध्ये 15 व ग्रामीण भागात 236 असे एकूण 498 रुग्ण आहेत, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.