Maval Corona Update :  आज तालुक्यात 49 जणांना डिस्चार्ज तर 42 नवे रुग्ण 

वडगाव मावळ – मावळ तालुक्यात शुक्रवारी (दि.30) 42 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 49 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही, आतापर्यंत 516 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 475 आहे.

शहरी भागात 8 तर ग्रामीण भागात 34 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 5 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 1 रुग्ण सापडला. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 2 रुग्ण सापडले. तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 25,860 झाली आहे. तर दिवसभरात 49 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

शुक्रवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात पवळेवाडी 5, नाणे 4, कामशेत 4, बऊर, तिकोणा, कान्हे, इंदोरी, राजपुरी व सोमाटणे प्रत्येकी 2, येलघोल, ब्राम्हणवाडी साते, वराळे, सुदुंबरे, साळुंब्रे, केवरे, शिलाटणे, सोमवडी व जांभुळ प्रत्येकी 1 असे एकूण 34 रुग्ण सापडले. 24,869 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 516 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 8,177, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 4,320 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1294 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 13,791 रुग्ण तर ग्रामीण भागात 12,069 रुग्ण आढळून आले आहेत. 1 रुग्णाची परिस्थिती गंभीर आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 96.17 टक्के आहे तर मृत्यू दर 2 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 132 लोणावळा नगरपरिषद मध्ये 60 वडगाव नगरपंचायत मध्ये 14 व ग्रामीण भागात 269 असे एकूण 475 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.