Maval Corona Update : मावळात 5 नवे पॉझिटिव्ह रुग्ण; तिघांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यात मंगळवार (दि.16) 5 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर दिवसभरात 03 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. तालुक्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 53 आहे.

वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत आज एकही रुग्ण सापडला नाही. तळेगाव नगरपरिषदेच्या हद्दीत 2 रूग्ण, तर लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत एक रूग्ण सापडला. सध्या रुग्णालयात 53 रुग्ण उपचार घेत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

मावळ तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 8187 झाली आहे. तर दिवसभरात 03 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मंगळवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये शहरी भागात 03 रुग्ण सापडले तर ग्रामीण भागात बऊर व इंदोरी येथे प्रत्येकी 01 रूग्ण सापडला.

मावळ तालुक्यात सध्या 53 रुग्ण सक्रिय आहेत. 7910जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. मावळ तालुक्यात आतापर्यंत 224 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 2491, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1614 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 540 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 4645 रुग्ण, तर ग्रामीण भागात 3542 रुग्ण आढळून आले आहेत. एकाही रुग्णाची परिस्थिती गंभीर नाही, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.