Maval Corona Update : मावळ तालुक्यात बुधवारी 50 नवीन रुग्णांची नोंद; 107 जणांना डिस्चार्ज

आज दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. : 50 new patients registered in Maval taluka on Wednesday; 107 people discharged

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (बुधवारी, दि. 12) कोरोनाचे 50 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाबधितांची एकूण संख्या 1 हजार 255 झाली आहे. तर दिवसभरात 107 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर एका रुग्णाचा आज दिवसभरात मृत्यू झाला आहे.

आज मृत्यू झालेला रुग्ण शनिवार पेठ, तळेगाव दाभाडे (पुरुष, 45 वर्ष) येथील आहे.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 27 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 23 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये कामशेत येथील सात, टाकवे बु., इंदोरी येथील प्रत्येकी दोन, माळवाडी, वराळे, गहूंजे, धामणे, सुदुंबरे, शिरगाव, शिळिंब, बोरज, कुसगाव प मा, साळूम्बरे, येळसे, राजपुरी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

तळेगाव शहरात 13, लोणावळा शहरात 6 आणि वडगावमध्ये 8 रुग्णांची नोंद झाली आहे.

एकूण 1 हजार 255 रुग्णांमध्ये सध्या 386 रुग्ण सक्रीय आहेत. तर 824 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 45 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 406, लोणावळा नगरपरिषद 136 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 93 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 620 रुग्ण आढळून आले आहेत.

सध्या रुग्णालयात 363 आणि होम आयसोलेशनमध्ये 23 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.