Maval Corona Update : दिवसभरात 50 जणांना डिस्चार्ज तर 55 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – तालुक्यात सोमवारी (दि.26) 55 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 50 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही, आतापर्यंत 501 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 480 आहे.

शहरी भागात 12 तर ग्रामीण भागात 43 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 8 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 4 रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत आज एकही रुग्ण सापडला नाही. तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 25,690 झाली आहे. तर दिवसभरात 50 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

सोमवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात कामशेत 9, कार्ला 7, साळुंब्रे 5, गहूंजे 4, शिरगाव, चिखलसे, चांदखेड, तिकोणा व वराळे प्रत्येकी 2, सांगवडे, औंढे खुर्द, डोंगरगाव, दुधीवरे, परंदवडी, जवन, आंबळे व सुदुंबरे येथे प्रत्येकी 1 असे एकूण 43 रुग्ण सापडले.

24,709 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 501 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 8,132 लोणावळा नगरपरिषद हद्दीत 4,303 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1284 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 13,719 रुग्ण तर ग्रामीण भागात 11,971 रुग्ण आढळून आले आहेत. 1 रुग्णाची परिस्थिती गंभीर आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 96.18 टक्के आहे तर मृत्यू दर 1.95 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 134 लोणावळा नगरपरिषद मध्ये 72 वडगाव नगरपंचायतमध्ये 11 व ग्रामीण भागात 263 असे एकूण 480 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.