Maval Corona Update : मावळ तालुक्यात आज कोरोनाचे 51 नवीन रुग्ण; 4 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (बुधवारी, दि. 26) कोरोनाचे 51 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाबधितांची एकूण संख्या 1 हजार 825 झाली. तर दिवसभरात 44 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज दिवसभरात चार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मृत्यू झालेले रुग्ण कुसगाव (पुरुष 65 वर्ष), लोणावळा (पुरुष 65 वर्ष), तळेगाव (पुरुष 73 वर्ष), लोणावळा (पुरुष 67 वर्ष) येथील आहेत.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 36 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 15 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये वराळे, सुदुंबरे येथील प्रत्येकी 3, कान्हे, बऊर येथील प्रत्येकी दोन, कामशेत, इंदोरी, नवलाख उंबरे, कशाळ, खांड येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.

तळेगाव शहरात 22, लोणावळा शहरात 12 आणि वडगावमध्ये दोन रुग्णाची नोंद झाली आहे.

एकूण 1 हजार 825 रुग्णांमध्ये सध्या 384 रुग्ण सक्रीय आहेत. तर 1 हजार 365 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 76 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 612, लोणावळा नगरपरिषद 215 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 124 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 874 रुग्ण आढळून आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.