Maval Corona Update : मावळात 52 सक्रिय रुग्ण; आज एकही रुग्णाची नोंद नाही

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज रविवारी (दि.31) एकाही कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली नाही. तालुक्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरु आहे. शहरी आणि ग्रामीण भागात एकाही रुग्णाची नोंद झाली नसून सध्या तालुक्यात कोरोनाचे 52 सक्रिय रुग्ण आहेत.

मावळ तालुक्यात आजवर 8 हजार 120 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यात 4 हजार 604 रुग्ण शहरी भागातील होते. तर ग्रामीण भागातील रुग्ण 3 हजार 516 रुग्ण होते. शहरी भागातील रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण तळेगाव शहरात आढळले.

तळेगाव नगर परिषद क्षेत्रात 2 हजार 462, लोणावळा नगर परिषद क्षेत्रात 1 हजार 606 तर वडगाव नगर पंचायत क्षेत्रात 536 रुग्ण आजवर आढळले आहेत. आतापर्यंत 224 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत कोरोनामुक्त झालेल्या 7 हजार 844 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या तालुक्यात 52 सक्रिय रुग्ण आहेत.

सक्रिय रुग्णांमध्ये 43 रुग्णांमध्ये लक्षणे दिसत असून 9 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत. रविवारी एकही रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला नाही. सध्या मावळ तालुक्यातील केवळ 13 गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.