Maval Corona Update : तालुक्यात दिवसभरात 55 जणांना डिस्चार्ज; 33 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात गुरुवारी (दि.5) 33 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 55 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज एक रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला असुन, आतापर्यंत 517 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 472 आहे. शहरी भागात 17 तर ग्रामीण भागात 16 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 8 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 7 रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 2 रुग्ण सापडले.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंत ची एकूण संख्या 26,164 झाली आहे. तर दिवसभरात 55 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. गुरुवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात भाजे 3,आढले बुद्रुक 2, तळेगाव दाभाडे ग्रामीण 2, कार्ला, कुणे नामा, कोंडीवडे नामा, नाणे, सोमाटणे, वळवंती, तिकोणा, वारू व भडवली प्रत्येकी 1 असे एकूण 16 रुग्ण सापडले. 25,175 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 517 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 8,224,लोणावळा नगरपरिषद हद्दीत 4,347 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1310 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 13,881 रुग्ण तर ग्रामीण भागात 12,283 रुग्ण आढळून आले आहेत. एकही रुग्णाची परिस्थिती गंभीर नाही.

कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 96.22 टक्के आहे तर मृत्यू दर 1.98 टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 92 लोणावळा नगरपरिषद मध्ये 41 वडगाव नगरपंचायत मध्ये 26 व ग्रामीण भागात 310 असे एकूण 472 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.