Maval Corona Update : मावळात 56 सक्रिय रुग्ण; आज तीन रुग्णांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यात गुरूवार (दि.18) एका रुग्णाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. दिवसभरात तीन जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. तालुक्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 56 आहे.

तळेगाव नगरपरिषद व लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत आज एकही रुग्ण सापडला नाही, तर वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 01 रूग्ण सापडला.  तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 8193 झाली आहे.

सध्या रुग्णालयात 56 रुग्ण उपचार घेत आहेत. दिवसभरात 03 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. गुरूवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये शहरी भागात 1 रुग्ण सापडला तर ग्रामीण भागात एकही रूग्ण सापडला नाही. तालुक्यात 56 रुग्ण सक्रिय आहेत.

मावळ तालुक्यात आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.आजपर्यंत 224 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यात आजपर्यंत 7913 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला.

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 2496, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1614 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 541 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 4651 रुग्ण तर ग्रामीण भागात 3542 रुग्ण आढळून आले आहेत. एकाही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.