Maval Corona Update :मावळात आज 56 रुग्णांची नोंद; 69 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (शनिवारी, दि. 10) 56 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 5 हजार 239 झाली आहे. तर दिवसभरात 69 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे कामशेत येथील एका जेष्ठ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 29 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 27 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. तळेगाव शहरात 19, लोणावळा शहरात 07, वडगाव शहरात 03 रुग्ण आढळले आहेत.

एकूण 5 हजार 239 रुग्णांमध्ये सध्या 432 रुग्ण सक्रीय आहेत. तर 4 हजार 629 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 178 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 69 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 1 हजार 519, लोणावळा नगरपरिषद 1 हजार 202 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 316 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 2 हजार 202 रुग्ण आढळून आले आहेत.

ग्रामीण भागात आढळलेले रुग्ण शनिवारी मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये इंदोरी 7, तळेगाव (ग्रामीण) 5, कुसगाव बुद्रुक 5, कामशेत 3, वराळे 2, टाकवे बु, कुरवंडे, कान्हे, पिंपळोली, नवलाख उंब्रे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

मावळातील 29 गावांमध्ये 15 पेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहेत. तर 4 गावांमध्ये 15 पेक्षा अधिक कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. एकूण 33 गावांना कोरोना शिल्लक आहे.

सध्या सक्रिय असलेल्या 432 रूग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू असल्याची माहिती मावळ तालुका कोविड कक्षाचे समन्वयक डाॅ गुणेश बागडे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.