Maval Corona Update: तळेगावमध्ये कोरोनाबाधित 57 वर्षीय महिलेचा मुलगा आणि नातही पॉझिटीव्ह

Maval Corona Update: 57-year-old Corona-affected woman's son and granddaughter tested positive in Talegaon मावळातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 31 वर

एमपीसीन्यूज – तळेगाव दाभाडे येथील कोरोनाबाधित 57 वर्षीय महिलेचा मुलगा (वय 33) व नात (वय 4.5) अशा दोघांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने मावळ तालुक्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 53 झाली आहे. त्यापैकी 19 जणांनी कोरोनावर मात केली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता तालुक्यातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 31 झाली आहे.

तळेगाव दाभाडे येथे राहणाऱ्या 57 वर्षीय महिलेला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने 19 जून त्यांना रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभाडे येथे तपासणीसाठी दाखल केले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी डाॅ. भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रूग्णालय तळेगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. तेथे तपासणीसाठी त्यांचा स्वॅब घेण्यात आला. काल शनिवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

या महिलेला संपर्कात पाच सदस्य असून, त्यांची तपासणी केली असता, त्यापैकी दोघे कोरोना पॉझिटीव्ह निघाले आहेत.  तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड व प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाॅ. प्रवीण कानडे यांनी सांगितले.

मावळ तालुक्यातील काल वराळे , तळेगाव येथील तीन आणि  लोणावळा येथील आयएनएस शिवाजी या कॅम्पसमधील 20 वर्षीय तीन प्रशिक्षणार्थी अशा पाच जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आले होते.  त्यात आज आणखी दोघांची भर पडली आहे. मावळ तालुक्यात आतापर्यंत एकूण 53 जणांना कोरोनाची लागण झाली. सध्या मावळ तालुक्यामध्ये सक्रिय रूग्णांची संख्या 29 आहेत, अशी माहिती मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.