Maval Corona Update : दिवसभरात 64 नवे रुग्ण; दिवसभरात 29 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यात गुरुवारी (दि.18) 64 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर दिवसभरात 29 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. सक्रिय रुग्णांची संख्या 351 आहे.

आज लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 16 रुग्ण सापडला. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 26 रुग्ण सापडले तर वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 01 रुग्ण सापडला. सध्या रुग्णालयात 351 रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 8818 झाली आहे. तर दिवसभरात 29 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

गुरूवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये शहरी भागात 43 रुग्ण सापडले. ग्रामीण भागात तळेगाव दाभाडे ग्रामीण येथे 03 रुग्ण सापडले तर नवलाख उंब्रे, ओवळे, वरसोली, इंदोरी व माळवाडी येथे प्रत्येकी 01 रुग्ण सापडला. सोमाटणे 02, गहुंजे येथे 03 रूग्ण सापडले. तर कुसगाव बुद्रुक व वराळे येथे प्रत्येकी 04 रुग्ण सापडले.

8236 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. मावळ तालुक्यातील आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 232 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 2753, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1700 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 582 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 5035 रुग्ण तर ग्रामीण भागात 3783 रुग्ण आढळून आले आहेत. एकाही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.