Maval Corona Update : तालुक्यात दिवसभरात 69 नवे रुग्ण; 78 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात रविवारी (दि.4) 69 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 78 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.आज एकही रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला नसुन आतापर्यंत 238 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला.

सक्रिय रुग्णांची संख्या 779 आहे. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 31 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 02 रुग्ण व वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत आज एकही रुग्ण सापडला नाही. सध्या रुग्णालयात 779 रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 10111 झाली आहे. तर दिवसभरात 78 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

रविवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये शहरी भागात 33 रुग्ण तर ग्रामीण भागात 36 रुग्ण सापडले. ग्रामीण भागात कामशेत 10, तळेगाव दाभाडे ग्रामीण 09, सोमाटणे 05 वराळे 04इंदोरी 03, गहूंजे, माळवाडी, नवलाख उंब्रे, फळणे, सुदवडी प्रत्येकी 01 रूग्ण सापडला. एकूण 36 रुग्ण सापडले.

9095 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 238 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 3314, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1886 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 643 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 5843 रुग्ण तर ग्रामीण भागात 4268 रुग्ण आढळून आले आहेत. एकाही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही.

कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 89.79 टक्के आहे तर मृत्यू दर 2.37 टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 344, लोणावळा नगरपरिषद मध्ये 137, वडगाव नगरपंचायतमध्ये 38 व ग्रामीण भागात 260 असे एकूण 779 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.