Maval Corona Update : मावळात आज 7 जणांना डिस्चार्ज; दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात मंगळवार (दि.19) 02 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर दिवसभरात 07जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. सक्रिय रूग्णांची संख्या 46 आहे.

वडगाव नगरपंचायत व तळेगाव नगरपरिषदेच्या हद्दीत आज एकही रूग्ण सापडला नाही. मात्र, लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 01रूग्ण सापडला.

सध्या रूग्णालयात 46 रुग्ण उपचार घेत असून तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 8060 झाली आहे. तर दिवसभरात 07 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मंगळवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये शहरी भागात 01, तर ग्रामीण भागात कामशेत येथे 01 रूग्ण सापडला. 7790 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. मावळ तालुक्यातील आज एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 224 रुग्णांचा मृत्यू झाला.

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 2431, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1602 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 535 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 4568 रुग्ण तर ग्रामीण भागात 3492रुग्ण आढळून आले. सध्या एकाही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.