Maval Corona Update : मावळमध्ये आज 74 नवे रुग्ण; 63 जणांना डिस्चार्ज

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात बुधवारी (दि.14) 74 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 63 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 501 इतकी आहे. सद्यस्थितीत तालुक्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 629 आहे .

मावळच्या शहरी भागात आज 38 तर ग्रामीण भागात 36 रुग्ण सापडले. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 22 रुग्ण, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 09 आणि वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 07 रुग्ण सापडले. तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 25,019 झाली आहे. तर दिवसभरात 63 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

बुधवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात दुधिवरे 07, तळेगाव दाभाडे ग्रामीण 05, कान्हे, भाजे व कार्ला येथे प्रत्येकी 03, सुदुंबरे व वराळे येथे प्रत्येकी 02, नाणे, चिखलसे, केवरे, साते, कुसगाव बुद्रुक, औंढे कल्हाट, जांभूळ, सांगिसे, नवलाख उंब्रे व मंगरूळ येथे प्रत्येकी 01 असे एकूण 36 रुग्ण सापडले.

तालुक्यात आतापर्यंत 23,889 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 501:रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 7,936 लोणावळा नगरपरिषद हद्दीत 4,187 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1,266 रुग्ण सापडले आहेत.

तालुक्याच्या शहरी भागात 13,389 रुग्ण तर ग्रामीण भागात 11,630 रुग्ण आढळून आले आहेत. 02 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 95.48 टक्के आहे तर मृत्यू दर 2 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये193 लोणावळा नगरपरिषदमध्ये 99 वडगाव नगरपंचायतमध्ये 18 व ग्रामीण भागात 319 असे एकूण 629 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.