Maval Corona Update : तालुक्यात 76 नवे रुग्ण तर 29 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यात रविवारी (दि.28) 76 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर दिवसभरात 29 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. तालुक्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 762 वर पोहोचली आहे.

आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 42 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 05 रुग्ण व वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 06 रुग्ण सापडले. सध्या रुग्णालयात 762 रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 9505 झाली आहे. तर दिवसभरात 29 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये शहरी भागात 53 रुग्ण सापडले. ग्रामीण भागात कामशेत व तळेगाव ग्रामीण प्रत्येकी 08, आंबी, सोमाटणे, चांदखेड, गहुंजे, उर्से, नाणे व कान्हे येथे प्रत्येकी 01 असे एकूण 23 रुग्ण सापडले.

8509 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. मावळ तालुक्यातील आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 232 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 3064, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1770 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 613 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 5447 रुग्ण तर ग्रामीण भागात 4058 रुग्ण आढळून आले आहेत.

तालुक्यातील एकाही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.