-MPC-TOP-MOST-BANNER-I

Maval Corona Update : तालुक्यात 76 नवे रुग्ण; 36 जणांना डिस्चार्ज

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात बुधवारी (दि.21) 76 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 36 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 501 इतकी आहे. रुग्ण संख्येत वाढ होत असुन रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 513 आहे. शहरी भागात 32 तर ग्रामीण भागात 44 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 25 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषद हद्दीत 7 रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत एकही रुग्ण सापडला नाही. तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 25,458 झाली आहे. तर दिवसभरात 37 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

बुधवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात बुधवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात कामशेत 8, कुसगाव बुद्रुक 6, वरसोली 5, चिखलसे, शिरगाव, तिकोणा, इंदोरी, कुसगाव पमा, तळेगाव दाभाडे ग्रामीण, व नवलाख उंब्रे प्रत्येकी 2, उकसान, केवरे, वारू, दुधीवरे, धन गव्हाण, माळवाडी, आंबळे, वराळे, टाकवे बुद्रुक, कोंडीवडे नामा व ब्राम्हणवाडी साते प्रत्येकी 1 असे एकूण 45 रुग्ण सापडले.

तालुक्यात आतापर्यंत 24,444 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 501 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 8070 लोणावळा नगरपरिषद हद्दीत 4267 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1289 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 13,617 रुग्ण तर ग्रामीण भागात 11,841 रुग्ण आढळून आले आहेत. एकही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 96.02 टक्के आहे तर मृत्यू दर 1097 टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 156 लोणावळा नगरपरिषदमध्ये 89 वडगाव नगरपंचायतमध्ये 21 व ग्रामीण भागात 247 असे एकूण 513 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.