Maval Corona Update : 8 नवे रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या 94 वर 

8 new patients, number of active patients 94 कामशेत व साई येथील प्रत्येकी 2 तर सुदुंबरे, कार्ला, मळवली, भांगरवाडी (लोणावळा) येथील प्रत्येकी एक अशा 8 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले

वडगाव मावळ –  मावळ तालुक्यात आज शुक्रवार (दि 10) रोजी कामशेत व साई येथील प्रत्येकी 2 तर सुदुंबरे, कार्ला, मळवली, भांगरवाडी (लोणावळा) येथील प्रत्येकी एक अशा 8 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्यधिकारी डॉ.चंद्रकात लोहारे यांनी दिली. 

दरम्यान, तालुक्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 94 आहे.

कामशेत येथील इंद्रायणी काॅलनीतील (दि 7) रोजी आढलेल्या बाधित व्यक्तीच्या 50 व 23 वर्षीय महिला निकटच्या संपर्कातील असल्याने (दि 9) रोजी स्वॅब घेण्यात आला होता. आज रोजी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. तळेगाव येथील कोविड केअर सेंटर येथे दाखल आहेत.

साई येथील 62 वर्षीय व्यक्ती व 29 वर्षीय महिला या दोन्हीना लक्षणे जाणवत होती म्हणून तळेगाव येथील कोविड केअर सेंटर मध्ये दाखल करण्यात आले होते. खाजगी लॅबमध्ये काल स्वॅब घेतला होता. आज रोजी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.

सुदुंबरे येथील 36 वर्षीय व्यक्तीला लक्षणे आढळल्याने (दि 8) रोजी स्वॅब घेण्यात आला होता. पिंपरी चिंचवड येथील रूग्णालयात उपचार घेत आहेत. आज रोजी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यांच्या जवळच्या संपर्कातील तीन व्यक्ती आहेत.

कार्ला येथील 55 वर्षीय व्यक्तीचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय असून पुणे, खेड, मंचर इत्यादी ठिकाणी विक्री व खरेदीसाठी जास्त असते. निमोनिया सदृश  लक्षणे आढळल्याने तळेगाव दाभाडे येथील जनरल हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. (दि 9) रोजी स्वॅब घेण्यात आला होता. आज रोजी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यांच्या निकटच्या संपर्कातील 9 व्यक्ती आहेत. त्याचबरोबर मळवली येथील 50 वर्षीय महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.

भांगरवाडी, लोणावळा येथील 60 वर्षीय महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.

दरम्यान, आज शुक्रवार (दि 10) रोजी 08 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्याची कोरोना रुग्णांची एकूण संख्या 184 वर पोचली आहे. त्यात शहरी भागातील 73 तर ग्रामीण भागातील 111 जणांचा समावेश आहे. आज पर्यंत 81 जणांनी कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. तर सक्रिय रूग्णांची संख्या 94 आहे आणि मृतांचा आकडा आज अखेर 09 आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like