Maval Corona Update : मावळात आज 8 जणांना डिस्चार्ज; चौघांचा अहवाल पॉझिटिव्ह

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात बुधवार (दि.20) 4 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. तर दिवसभरात 8 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. तालुक्यातील सक्रिय रूग्णांची संख्या 42 आहे.

वडगाव नगरपंचायत व लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत आज एकही रूग्ण सापडला नाही. तर तळेगाव नगरपरिषदेच्या हद्दीत 01रूग्ण सापडला.

सध्या रूग्णालयात 42 रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 8064 झाली आहे. दिवसभरात 08 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 7798 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

बुधवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये शहरी भागात 01 रुग्ण सापडले तर ग्रामीण भागात वराळे येथे 02 रूग्ण तर तळेगाव दाभाडे (ग्रामीण) येथे 01 सापडला.

मावळ तालुक्यातील आज एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 224 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 2432, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1602 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 535 रुग्ण सापडले आहेत.

आजपर्यंत मावळ तालुक्यातील शहरी भागात 4569, तर ग्रामीण भागात 3495रुग्ण आढळून आले आहेत. सध्या एकाही रुग्णाची परिस्थिती गंभीर नाही, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.